Premium

Video: अखेर भांडण मिटलं! कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हर सहा वर्षांनी दिसणार एकत्र; दोघांनी नव्या शोची केली घोषणा

सुनील ग्रोव्हर अन् कपिल शर्माच्या नव्या शोबद्दल माहिती देणारा व्हिडीओ पाहिलात का?

Kapil Sharma Sunil Grover to work Together
नवीन शोचा व्हिडीओ चर्चेत (फोटो – स्क्रीनशॉट)

टीव्ही कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मधील प्रत्येक पात्र लोकप्रिय आहे. या शोमध्ये सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, चंदन प्रभाकर, सुनील ग्रोव्हर यांनी महत्त्वाची पात्रं साकारली होती. पण काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाला जाताना कपिल व सुनीलचं विमानात भांडण झालं, नंतर ‘डॉ. गुलाटी’ हे पात्र साकारणाऱ्या सुनीलने हा शो सोडला. त्यानंतर बऱ्याचदा तो परतेल अशी चर्चा झाली मात्र सुनील परतला नाही. पण आता सहा वर्षांनी कपिल व सुनील यांच्यातील सर्व मतभेद संपले आहेत आणि ते नव्या शोमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडणानंतर अनेक वर्षांनी सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा पडद्यावर एकत्र येत आहेत. दोघेही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर नवीन शोमधून प्रेक्षकांना हसवण्यासाठी येणार आहेत. त्यांनी नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. याचा एक प्रोमोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रोमो कॉमेडियन कृष्णा अभिषेकने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये कपिल व सुनील एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

ताजमध्ये वेटर, १४ वर्षे बेकरीत केलं काम अन् ४४ व्या वर्षी बॉलीवूड पदार्पण; जाणून घ्या बोमन इराणींची एकूण संपत्ती

कपिल, सुनील व त्यांची टीम जवळपास १९० देशांमध्ये दौरा करणार आहे. याबाबतच त्यांनी या व्हिडीओतून माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये सुनील ग्रोव्हर कपिल शर्मासमोर अट ठेवतो. सुनिल कपिलला म्हणतो की तो विमानाने नाही तर रस्त्याने प्रवास करून ऑस्ट्रेलियाला जाईल. त्यावर कपिल होकार देतो. या व्हिडीओमध्ये राजीव ठाकूर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि अर्चना पूरण सिंग हेदेखील दिसत आहेत.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…

२०१७ मध्ये विमानात झाले होते भांडण

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात विमानामध्ये भांडण झालं होतं. २०१७ मध्ये झालेल्या या भांडणानंतर सुनील गोव्हरने कपिलचा शो सोडला होता. त्या भांडणानंतर आता जवळपास सहा वर्षांनी त्यांची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. मात्र, त्याच्या आगामी नव्या प्रोजेक्टचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kapil sharma sunil grover to work together in netflix show after flight fight hrc

First published on: 02-12-2023 at 16:31 IST
Next Story
“त्यांच्या लग्नात फक्त १८ लोक…” आदित्य चोप्रा व राणी मुखर्जीच्या सीक्रेट लग्नाबद्दल करण जोहरचा खुलासा