सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे पाहिलं जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं होतं. यात रिया आणि तिच्या भावाचं नाव उघड झालं होतं. सध्या रियाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा रियाची सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. अलिकडेच रियाने एका पार्टीमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी रियाने राजीव लक्ष्मणसोबत पार्टी केली असून या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. View this post on Instagram A post shared by Rajiv Lakshman (@rajivlakshman) राजीव लक्ष्मणने मित्रांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं.या पार्टीमध्ये रियाने हजेरी लावली होते. या पार्टीचे फोटो राजीवने शेअर केले आहेत. यातील एका फोटोत त्याच्यासोबत रिया दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत माय गर्ल असं कॅप्शन त्याने दिलं आहे. वाचा : रिया चक्रवर्ती नव्या घराच्या शोधात? सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी रियाचे आई-वडील नव्या घराच्या शोधात असल्याचं दिसून आलं होतं.