लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मराठीची पताका सातासमुद्रापार आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये फडकत असून, तिथल्या मानाच्या पुरस्कारांवरही मराठी चित्रपट नाव कोरण्यात यशस्वी होत आहेत. विषय आणि आशयाची अचूक सांगड घालत येणारे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी जगण्याचा सकारात्मक मंत्र देणारा ‘जगा चार दिवस’ हा आगामी मराठी चित्रपटही याच पठडीतील आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनिमुद्रणाने करण्यात आला.

जागृती एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या ‘जगा चार दिवस’चे निर्माते मुकुंद महाले आणि जागृती राहुल मोरे आहेत. डॉ. शांताराम दादा सोनावणे आणि राहुल सोनावणे यांचे देवा चलचित्र आणि मयुरेश फिल्म्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. अंधेरीतील स्पेस म्युझिक स्टुडिओमध्ये ‘मी तुला पाहिले, तू मला पाहिले..’ या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी परभणीचे माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, निर्माते मुकुंद महाले, सहनिर्माते डॉ. शांताराम दादा सोनावणे, राहुल सोनावणे, दिग्दर्शक सरकार आर. पी., अभिनेते गुरू आनंद तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. गीतकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी हे गाणं लिहिलं असून, संगीतकार दिनेश अर्जुना यांनी स्वप्निल बांदोडकर आणि डॉ. नेहा राजपाल यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोने लग्नाच्या काही तासांपूर्वी शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “सासरी रमेपर्यंत…”

सस्पेन्स हॉरर कॅामेडी फॅमिली एन्टरटेनर असलेल्या जगा चार दिवसह्णचे दिग्दर्शक सरकार आर. पी. असून, कथालेखनही त्यांनीच केलं आहे. या चित्रपटाची पटकथा व संवादलेखन मुकुंद महाले यांनी केलं आहे. गीतकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीत साज चढवला आहे. छायांकनाची जबाबदारी डीओपी एच. डी. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवम गौड या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Song from the movie jaga char diwas produced by jagruti entertainment news amy