Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Wedding: “मला वेड लागले प्रेमाचे…” म्हणत घराघरात पोहोचलेला दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब उद्या, २४ फेब्रुवारीला बोहल्यावर चढणार आहे. क्षितीजा घोसाळकरसह प्रथमेश लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीचे विधी सुरू झाले असून सध्या याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने लग्नाआधी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: “संगीत, हळद अन् सातफेरे…”, रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी यांचं दोन पद्धतीत झालं लग्न, पाहा व्हिडीओ

क्षितीजा घोसाळकरने घराबाहेरील फोटो शेअर करून लग्नाच्या काही तासांपूर्वी एक पोस्ट लिहिली आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या घराबाहेर बसलेली आणि उभी राहिलेली पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत क्षितीजाने लिहिलं आहे, “Dear Home Sweet Home, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर. आजपर्यंत , तुझी ‘माझं घर’ अशी असलेली ओळख आता ‘माझं माहेर’ अशी होणार..आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार…तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळालाय! बघ ना, काही मनसोक्त हसतायत…काही अलवार रडतायत..काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय…तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल…त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार…”

“सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला…तुही मग तयार राहा, आपलं नेहमीचं हितगुज करायला…PS- सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल,” असं क्षितीजाने लिहिलं आहे.

क्षितीजाच्या या पोस्टवर प्रथमेशसह इतर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्याने प्रतिक्रियेत लिहिलं, “किती छान…तुला इकडे एवढं प्रेम देऊ की, तुला दोन्ही घर आपली वाटतील….आय लव्ह यू” तसेच इतर नेटकरी म्हणाले, “किती गोड लिहिलं यार”, “किती छान कॅप्शन लिहिलंय सुंदर.”

हेही वाचा – भगरे गुरुजींच्या लेकीनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचं केलं केळवण, फोटो शेअर करत म्हणाली…

प्रथमेश-क्षितिजाचा प्रेमविवाह आहे. इन्टाग्रामवर दोघांची पहिली ओळख झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे आता दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh parab future wife kshitija ghosalkar share emotional post before wedding pps
First published on: 23-02-2024 at 18:31 IST