‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांपासून बेपत्ता होता. तो अखेर स्वतःच घरी परतला आहे. २२ एप्रिलपासून गुरुचरण बेपत्ता होता आणि दिल्ली पोलीस त्याचा राजधानीसह जवळच्या राज्यांमध्ये शोध घेत होते. दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊनही त्याचा शोध घेतला होता. आता २५ दिवसांनी परतलेल्या गुरुचरण सिंगला पहिला फोटो समोर आला आहे.

गुरुचरण सिंग शुक्रवारी (१७ मे रोजी) दिल्लीतील पालम भागात घरी आला. गुरुचरण घरी आला, त्याबद्दल पोलिसांना कळवण्यात आलं. मग पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीत तो नेमका कुठे गेला होता, याबाबत त्याने सांगितलं. घरदार सोडून गुरुचरण सिंग धार्मिक प्रवासावर गेला होता, असं त्याने स्वतः चौकशीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं.

अखेर २५ दिवसांनी परतला बेपत्ता गुरुचरण सिंग, नेमका कुठे गेला होता? त्यानेच पोलिसांना दिली माहिती

जवळपास २५ दिवसांत गुरुचरण सिंग अमृतसर आणि लुधियाना सारख्या अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये थांबला होता, पण नंतर आपण घरी जायला पाहिजे याची त्याला जाणीव झाली आणि तो घरी परतला, असं त्याने पोलिसांनी सांगितलं. आता घरी परतलेल्या गुरुचरणचा पोलिसांबरोबरचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात ५० वर्षीय गुरुचरणचे केस पांढरे झाल्याचं दिसतंय.

Video: नुपूर शिखरेचं आईसह ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त रील; पत्नी आयरा खानची खास कमेंट, तर सुश्मिता सेनला हसू आवरेना

धार्मिक यात्रा करायला गेलेला गुरुचरण सिंग सुखरुप घरी परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अभिनेता अविवाहित असून त्याचे आई-वडील खूप वृद्ध आहेत. त्यामुळे गुरुचरण अचानक बेपत्ता झाल्याने त्यांना धक्का बसला होता. पोलीसही त्याचा शोध घेत होते. त्यांनी गुरुचरणला शोधण्यासाठी दिल्लीसह उत्तराखंड व हरियाणा तसेच मुंबईला भेट दिली होती.

“माझी आई बाबांच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती,” अभिनेत्री अलायाचा गौप्यस्फोट; म्हणाली, “माझा सावत्र भाऊ…”

दरम्यान २२ एप्रिलला मुंबईला जात असल्याचं सांगून गुरुचरण सिंग घराबाहेर पडला. पण तो दिल्ली विमानतळावर पोहोचलाच नाही. त्याने मुंबईला येत असल्याचं मित्रांना सांगितलं होतं, मात्र तो विमानात बसलाच नाही हे कळाल्यावर त्यांनी शोधाशोध सुरू केली. चार दिवस कुटुंबीय व मित्रांनी शोध घेऊनही तो सापडला नाही मग त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. २६ एप्रिलला हरगीत सिंग यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. पोलिसांना अभिनेत्याचा अपहरण झाल्याचा संशय होता. तसेच त्याने त्याच्या दोन फोनपैकी एक घरात ठेवला तर दुसरा पालम भागात सापडला होता. त्याने त्याच्या बँक खात्यातून १४ हजार रुपये काढले होते. त्याची बँक खाती तपासल्यावर त्याच्यावर कर्ज असल्याचं आढळलं होतं.