Premium

दोन घटस्फोट झालेल्या स्नेहा वाघचे प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल वक्तव्य, म्हणाली “त्या माणसाशी…”

स्नेहाने तिचा तो काळ खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता.

sneha wagh
स्नेहा वाघ

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्नेहा वाघला ओळखले जाते. ती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. स्नेहा वाघच्या लव्हलाईफची आणि वैवाहिक आयुष्याची कायमच चर्चा होताना दिसते. नुकतंच स्नेहाने प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्नेहा वाघ ही कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकतंच स्नेहाने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन घेतले. यावेळी तिला तिच्या मालिकेसह खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिने प्रेमाबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “…तर मी आता कुठे असते?” स्नेहा वाघच्या पोस्टने वेधलं लक्ष

यावेळी स्नेहाला प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल तुझं काय मत आहे, असे विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, “प्रेम आणि रिलेशनशिप या गोष्टी त्या त्या माणसाशी निगडीत असतात. मी त्याबद्दल काय विचार करते हे मी सांगू शकत नाही. मी याबद्दल काय उत्तर देऊ हेच मला आता समजत नाही. मी जशी आहे तशी आता फार आनंदात आहे.”

दरम्यान स्नेहा वाघने अगदी कमी वयात म्हणजेच अवघ्या १९ वर्षांची असताना स्नेहाने अविष्कार दार्व्हेकरबरोबर लग्नगाठ बांधली. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा समाना करावा लागला. तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता.

आणखी वाचा : हृदयविकाराचा झटका आलेल्या सुश्मिता सेनला वडिलांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले “तुम्ही हृदयाला…”

त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी स्नेहाने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने इंटेरियर डिझायन असलेल्या अनुराग सोलंकीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. पण तिचे हे दुसरे लग्नही जवळपास आठ महिनेच टिकलं. त्यानंतर स्नेहा दुसऱ्या पतीपासून देखील विभक्त झाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sneha wagh talk about her thought about love and relationship nrp

First published on: 02-03-2023 at 19:14 IST
Next Story
Video : “अनेक संधी आल्या, पण आम्ही…” पत्नीबरोबर काम करण्याबद्दल विराजस कुलकर्णीने मांडले मत