टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आता ‘बिग बॉस १७’ मधील टॉप पाच स्पर्धकांपैकी एक आहे. अंकिताचा पती विकी जैनही या शोमध्ये तिच्याबरोबर सहभागी झाला होता, पण फिनालेच्या एका आठवड्याआधी तो कमी मतं मिळाल्याने घराबाहेर पडला. या घरात अंकिता व विकीचे बरेच वाद पाहायला मिळाले, इतकंच नाही तर विकीने घराबाहेर आल्यानंतर गर्ल गँगबरोबर पार्टी केली, त्यानंतर विकी ट्रोलही झाला. अशातच विकीचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे, ज्यात त्याच्याबरोबर एक अभिनेत्री आहे. या दोघांचं एकेकाळी अफेअर होतं, असं म्हटलं जातंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खंर तर अंकिता लोखंडे विकीला भेटण्याआधी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. जवळपास सहा वर्ष ते एकत्र होते, पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. पण विकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार लोकांना माहित नाही. अंकिताने विकी व मनाराच्या मैत्रीवर आक्षेप घेतल्यानंतर विकी जैनचे दोन फोटो व्हायरल झाले. त्यात त्याच्याबरोबर अभिनेत्री टिया बाजपेयी दिसत आहे. टिया व विकी डेट करत होते, असं म्हटलं जातंय. पण ही खूप जुनी गोष्ट आहे.

लेक घरी नसताना जावयाने गर्ल गँगसह केली पार्टी; अंकिता लोखंडेच्या आई म्हणाल्या, “विकीने त्या सर्वांना…”

विकी जैन यापूर्वी ट्विंकल बाजपेयी म्हणजेच टिया बाजपेयीसह डेटिंग करत होता. ‘सियासत’ च्या वृत्तानुसार, विकी आणि टिया २०१२ मध्ये एकमेकांना डेट करत होते, त्यावेळी विकी बॉक्स क्रिकेट लीगचा मालक होता. विकी व टिया यांनी कधीच त्यांच्या नात्याची जाहिरपणे कबुली दिली नव्हती. दरम्यान, बिग बॉसमध्ये अंकिताला एकदा विकीच्या एक्स गर्लफ्रेंडबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्याच्या चार गर्लफ्रेंड्सची आपल्याला माहिती होती, असं ती म्हणाली होती.

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

विकी जैन व टिया बाजपेयी यांचे फोटो

टिया बाजपेयी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘हॉन्टेड थ्रीडी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ती ‘1920: एविल रिटर्न्स’ आणि ‘बांके की क्रेझी बारात’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. याव्यतिरिक्त तिने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’ आणि ‘अनहोनियों का अंधेरा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande husband vicky jain once dated actress tia bajpai old photos viral hrc
First published on: 27-01-2024 at 14:28 IST