‘बिग बॉस 17’ चा ग्रँड फिनाले रविवारी (२८ जानेवारी रोजी) होणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला अंकिताचा पती विकी जैन या शोमधून बाहेर पडला. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर विकी जैनने शोमधील महिला स्पर्धकांबरोबर पार्टी केली. त्यावर अंकिताच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच विकीने त्याच्या घरी एक ग्रँड पार्टी आयोजित केली होती. ज्यात त्याचे मित्र आणि शोमधील माजी स्पर्धक ईशा मालवीय, सना खान, आयशा खान या सहभागी झाल्या होत्या. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अंकिता आणि विकीच्या मुंबईच्या घरातील हे फोटो होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अंकिताच्या आई श्वेता लोखंडे यांना त्याबद्दल विचारण्यात आलं.

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

“विकी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर बिग बॉसमध्ये त्याच्याबरोबर होते, त्या स्पर्धकांनी त्याला फोन केले. त्यामुळे विकीने त्या सर्वांना घरी बोलावलं. मग सर्वांनी एकत्र पार्टी केली. मीही सर्वांना भेटले, सर्वांशी गप्पा मारल्या,” असं श्वेता लोखंडे म्हणाल्या.

“मला गांजा ओढायला खूप आवडतं”, नवाजुद्दीन सिद्दीकीचा खुलासा; किस्सा सांगत म्हणाला, “स्वानंद किरकिरेंनी…”

दरम्यान, विकी शोमधून बाहेर गेल्यावर पार्टी करेल, याबाबत अंकिताला शंका होती. त्यामुळे घरी गेल्यावर सीसीटीव्ही बघणार असं ती शोमध्ये म्हणाली होती. दुसरीकडे रोहित शेट्टीने स्पर्धकांची शोमध्ये भेट घेतली तेव्हा विकीच्या पार्टीबद्दल त्याने अंकिताला सांगितलं. त्यावर तो मार खाणार असं अंकिता म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande mother reaction on vicky jain party with girl gang bigg boss 17 hrc
First published on: 27-01-2024 at 11:07 IST