लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हिने तिच्या दुसऱ्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून दलजीत पतीपासून वेगळी होणार असल्याच्या चर्चा होत्या, आता तिने या प्रकरणावर मौन सोडलं आहे. तिने पतीच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

दलजीत कौरने १८ मार्च २०२३ रोजी एनआरआय निखिल पटेल याच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. पण ती काही महिन्यांपूर्वी मुलगा जेडनसह भारतात परतली. तेव्हापासून तिच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, तिने या प्रकरणी अनेक महिने प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. आता तिने पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे स्क्रीनशॉट्स इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

पतीचे विवाहबाह्य संबंध? वर्षभरापूर्वी दुसरं लग्न करणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “मुलांसाठी गप्प…”

दलजीत कौरने तिचा दुसरा पती निखिल पटेलपासून विभक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तिने निखिलवर आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तिने निखिलला ‘निर्लज्ज’ म्हटलंय, इतकंच नाही तर त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचा ‘अपमान’ केल्याचा आरोप केला आहे.

“मी अलैंगिक आहे का? असा पहिला विचार…”; प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “लोक काय म्हणतील…”

विवाहबाह्य संबंधांवरून दलजीत व निखिल यांचं बिनसलं आहे. दलजीतने इन्स्टा स्टोरीवर तिचा पती निखिलची एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो एसएन नावाच्या व्यक्तीसाठी कमेंट करतोय. ‘you make me better’ अशी कमेंट दिसतेय. “तू आता तिच्याबरोबर सोशल मीडियावर निर्लज्जपणे बोलतोय, लग्नाच्या १० महिन्यांत तुझी पत्नी आणि मुलगा माघारी परतले, संपूर्ण कुटुंबाचा अपमान झालाय. तुला किमान मुलांसाठी तरी थोडी लाज वाटायला हवी होती,” असं निखिलची पोस्ट शेअर करत दिलजीतने लिहिलं.

दलजीत कौरची इन्स्टाग्राम स्टोरी

“किमान लोकांसमोर तरी आपल्या बायकोबद्दल तू थोडा आदर दाखवायला हवा होता कारण आतापर्यंत मी गप्प बसले होते,” असं पुढे दिलजीतने लिहिलं. दलजीतच्या या पोस्टवरून तिच्या पतीचं अफेअर होतं आणि त्यामुळे ती त्याला सोडून भारतात निघून आली आहे, असं स्पष्ट होतंय.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

दरम्यान, दलजीत व निखिल यांचं हे दुसरं लग्न होतं. तिचं पहिलं लग्न अभिनेता शालीन भनोतशी झालं होतं, पण लग्नानंतर काही वर्षांनी ते दोघे विभक्त झाले. त्यांना जेडन नावाचा मुलगा असून तो दलजीतबरोबर राहतो. तर, निखिल पटेल याचंही दलजीतशी दुसरं लग्न होतं. त्याला त्याच्या पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. त्यांनी गेल्या वर्षी मुंबईत लग्न केलं होतं.