गोविंदाची भाची व अभिनेत्री आरती सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीने सांगितलं की तिचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग नसेल तर ती मंदिरात लग्न करणार आहे. आरती व दिपक यांचं अरेंज मॅरेज आहे. ते गेल्या वर्षी जुलैमध्ये भेटले होते, त्यानंतर एकत्र वेळ घालवल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती दिपक चौहानशी २५ एप्रिलला मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न करणार आहे.

”मी दागिने घालणार नाही किंवा लग्नाआधीचे कोणतेही कार्यक्रम नसतील, असं नाही. सर्व काही होईल. मी लूक कसा करायचा ते ठरवलंय आणि हेवी ज्वेलरी मी लग्नाच्या दिवशी घालेन. पण मला साधेपणा आवडतो, माझे लग्न इस्कॉन मंदिरात होणार आहे आणि माझी इच्छा जशी होती, तसंच सगळं घडत आहे,” असं आरती म्हणाली.

लग्नाआधी काशी विश्वनाथच्या दर्शनाला पोहोचली ३९ वर्षीय अभिनेत्री, मंदिरात ठेवलेल्या पत्रिकेने वेधलं लक्ष

ती पुढे म्हणाली, “सुरुवातीला मला वाटलं की काशी विश्वनाथला जाऊन लग्न करावे, पण नंतर विचार केला की खूप नातेवाईक आहेत, इंडस्ट्रीतील मित्र आहेत. माझ्याइतकेच तेही माझे लग्नासाठी उत्साहित आहेत. माझे मित्र म्हणतायत की तू नाही बोलावलंस तरी आम्ही तुझ्या लग्नाला येऊ. अंकिता लोखंडे प्रत्येक कार्यक्रमात असणार आहे. प्रिंस नरुला ऑस्ट्रेलियाला गेला, पण युविका माझ्या लग्नासाठी थांबली. मी ही नाती कमावली आहेत आणि मी खूप आनंदी आहे.”

“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”

आरतीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘मायका’, ‘थोडा है बस थोडा की जरुरत है’, ‘परिचय’, ‘उत्तरन’, ‘उडान’, ‘ससुराल सिमर का’ यासारख्या टीव्ही मालिका केल्या आहेत. आरती शेवटची ‘श्रावणी’ मालिकेत दिसली होती. याशिवाय ती बिग बॉस १३ मध्येही सहभागी झाली होती.