‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके नेहमी चर्चेत असतो. कुशलने आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीनं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे.

सध्या कुशल सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात तो अभिनेत्री हेमांगी कवीसह दिसत आहे. ‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमातून त्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. कुशल नेहमी या कार्यक्रमातील स्किटचे व्हिडीओ शेअर करत असतो. त्यावर चाहते त्याचं कौतुक करत असतात. अशातच कुशलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – नवरी मिळे हिटलरला: एजे-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात सोनाली कुलकर्णीचा ‘या’ गाण्यावर खास परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ

या फोटोमध्ये कुशलच्या हातात बॅग आणि इतर सामान दिसत आहे. तर त्याची बायको सुनयना रिकाम्या हाताने त्याच्या पुढे चालताना पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत कुशलने लिहिलं आहे, “मागे एका भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या संसाराचा भार हिने एकटीनेच उचललाय म्हणून.”

हेही वाचा – “१० ते १५ दिवस… “, संकर्षण कऱ्हाडे सांगितली राजकीय परिस्थितीवर व्हायरल होणाऱ्या कवितेच्या मागची गोष्ट, अभिनेता म्हणाला, “रोज रात्री….”

कुशलचा हा फोटो पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवधूत गुप्ते, तेजस्विनी पंडीत, नम्रता संभेराव, शर्मिला शिंदे अशा अनेकांनी कुशलच्या या पोस्टवर हसण्याचे इमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “घरातील विषय सार्वजनिक नका करू दादा..गरम पोळ्या बंद होतील ना तुमच्या”, “कशी नशिबानं थट्टा आज मांडली”, “आज सगळं पुराव्यासहित उत्तर दिलं”, अशा मजेशीर प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत.