‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यासारख्या असंख्य चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून ते कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आणि अभिनेता कुशल बद्रिकेच्या मैत्रीचा किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजू माने यांनी नुकतंच एका युट्यब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना तुमची आणि कुशल बद्रिकेची मैत्री कशी झाली, याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी कुशलला झालेल्या दुखापतीबद्दल सांगितले.
आणखी वाचा : “आम्ही एक वडापाव…”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने सांगितल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाले “दुधासाठी पैसे…”

विजू माने काय म्हणाले?

“मला कुशल बद्रिके हा अभिनेता म्हणून आवडायचा. मी एका स्पर्धेत एकांकिका बसवली होती. त्यात कुशल होता. यात त्याचा पहिला प्रवेश अगदी अडीच मिनिटांचा होता. या अडीच मिनिटात प्रवेशात कुशलने उजव्या विंगमधून एक्झिट घेतली आणि त्या विंगेतून त्या धावत यायचं होतं. तो जेव्हा धावत आला तेव्हा त्याच्या खांद्यावर रुमाल होता. प्रयोग सुरु असताना चौथ्या पाचव्या मिनिटाला लक्षात आलं की कायतरी गडबड आहे. त्याच्या खांद्यावर रुमाल लाल होत चाललाय, असं मला जाणवलं. त्यावेळी आमच्या गडकरी नाट्यगृहाच्या मागे एक गोल खांब होता.

कुशलने तिथे एंट्री केली, तेव्हा तो खांब्यावर आदळला आणि त्याचे पुढचे दोन्ही दात तुटले. ते दोन दात तिथे पडलेले होते. त्याच रक्त वाहत असलेल्या अवस्थेत कुशलने रुमाल घेऊन संपूर्ण एकांकिका केली. त्यावेळी तेच पंच, स्किट आणि त्याला झालेली दुखापत कोणालाही कळली नाही. पुढची ४० मिनिटे त्याने ती एकांकिका केली. त्याचे पहिले दोन्ही दात खोटे आहेत.

त्याचा रुमाल संपूर्ण रक्ताने भरला होता. त्याने प्रेक्षकांना जाणवूच दिलं नाही. एकाही प्रेक्षकाला कळलं नाही. त्यावेळी मग मला तो मुलगा चांगला आहे, असं वाटलं. त्यानंतर मग मी गोजिरी चित्रपटासाठी कुशलची निवड केली. हा चित्रपट झाला आणि नंतर मग कुशललाही चांगली काम मिळायला लागली.

त्यानंतर मी एकदा जेवायला गेलो होतो, त्या हॉटेलच्या मार्केटिंग टीममध्ये मला कुशल दिसला. तो टाय, सूट, बूट घालून उभा होता. यानंतर मी तिथे गेलो, त्याला काय विचारलं. तर त्याने माझे सिनीअर आहेत, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी मी त्याला घरी बोलवले आणि याबद्दल विचारले. त्यावेळी त्याला पहिला टाय काढ असे सांगितले. त्यावेळी तो म्हणाला, दादा नोकरी करावी लागेल. यात माझं काही भागत नाही. लग्न करायचं. तिच्या वडिलांना मी अमुक अमुक रक्कम आणून देईन असं सांगितलंय. यानंतर मग मी त्याला तू तुझे सिनेसृष्टीतील करिअर सुरु ठेव. तुला दर महिन्यात जी काही रक्कम लागेल ती मी तुला देत जाईन, असे सांगितले. यानंतर मग आमची मैत्री झाली. आता तर तो मला माझ्या भावासारखाच आहे”, असे विजू माने यांनी सांगितले.

आणखी वाचा : “सतीश तारेंसारखा दुसरा नट…”, वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “त्यांना किंग ऑफ टायमिंग…”

दरम्यान कुशल बद्रिके आणि विजू माने गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कुशल बद्रिकेने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’मधून तो घराघरात पोहोचला. ‘जत्रा’, ‘पांडू’, ‘बापमाणूस’, ‘भिरकीट’ अशा चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. ‘रावरंभा’ या चित्रपटात कुशलने पहिल्यांदाच ऐतिहासिक पात्र साकारले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director viju mane reveled kushal badrike two teeth fake share story behind it nrp
Show comments