केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेसाठी बससेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईट http://www.cbse.nic.in. वर जाऊनही निकाल पाहू शकणार आहेत. याशिवाय cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

विद्यार्थी टेलिफोन नंबरवरुनही (०११ – २४३००६९९) आपला निकाल मिळवू शकतात. अन्यथा ७७३८२९९८९९ या क्रमांकावर एसएमएस पाठवून आपला निकाल मिळू शकतो. याआधी निकाल दुपारी ४ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याआधीच दुपारी २ वाजता निकाल जाहीर करण्यात आला.

क्षेत्रानुसार पहायचं झाल्यास तिरुअनंतपुरम, चेन्नई आणि अजमेर पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तिरुअनंतपुरम ९९.६० टक्क्यांसोबत पहिल्या क्रमांकावर असून, चेन्नई ९७.३७ आणि अजमेर ९१.८६ टक्क्यांसोबत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

निकालात ८८.६७ टक्क्यांसोबत मुलींनी बाजी मारली असून मुलांची टक्केवारी ८५.३२ आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का मुलांपेक्षा ३.३५ टक्के जास्त आहे. सीबीएसई दहावी बोर्ड परिक्षेसाठी १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थी बसले होते. यामधील १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण टक्का ८६.७० आहे.

या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
– प्रकाश मित्तल (४९९ मार्क्स) – डीपीएस गुडगाव शाळा
– रिमझिम अग्रवाल (४९९ मार्क्स) – आर पी पब्लिक स्कूल, बिजनोर
– नंदिनी गर्ग (४९९ मार्क्स) – स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूल, शामली
– श्रीलक्ष्मी (४९९ मार्क्स) – भवन्स विद्यालय, कोचिन

कसा बघाल निकाल?

पहिली पायरी – cbse.nic.in या वेबसाइटवर जा
दुसरी पायरी – CBSE 10th Result 2018, CBSE Class 10th Result 2018
ही लिंक शोधा व तिच्यावर क्लिक करा
तिसरी पायरी – आपला रोल नंबर भरा
चौथी पायरी – तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करा म्हणजे तो तुम्हाला नंतरही उपयोगी येऊ शकेल.