News Flash

एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी

परिणामी वारसांकडून नोकरीसाठी एसटीकडे हेलपाटे मारावे लागत होते.

मुंबई : करोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकं पातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी वारसांकडून नोकरीसाठी एसटीकडे हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे महामंडळावर बरीच टीका झाल्यानंतर वारसांना अनुकं पातत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात शनिवारी परिपत्रक जारी के ले.

परिपत्रकानुसार, सेवेत असताना अन्य कारणांमुळे किंवा करोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला नोकरी देण्यात येईल, असे स्पष्ट के ले आहे. रिक्त जागेची उपलब्धता पाहता महामंडळाने याबाबत निर्णय घेतला व त्याचे अनुपालन करावे, अशा सूचना राज्यातील एसटीचे सर्व विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक यांना दिल्या आहेत. एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सेवेत असताना करोना किं वा अन्य कारणांमुळे जरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकं पातत्त्वावर नोकरी दिली जाईलच. हे आधीही स्पष्ट के ले होते. रिक्त जागा पाहता आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक जारी के ल्याचे सांगितले. दरम्यान, आतापर्यंत करोनामुळे एसटीतील एकू ण ८ हजार ५८७ कर्मचारी करोनाबाधित झाले असून २६५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ६७८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 1:50 am

Web Title: jobs to the legacy of st employees akp 94
Next Stories
1 करोना काळात शिक्षणात खंड, बालमजूर वाढले
2 पावसाळ्यात सावधगिरीचा इशारा
3 हॉटेल व्यावसायिकांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्या
Just Now!
X