News Flash

अर्धनग्न महिलेमुळे लोकलमध्ये खळबळ

अर्धनग्न आणि बेशुद्धावस्थेत एक महिला आढळल्यानंतर गाडीत एकच गोंधळ उडाला.

ठाण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात अर्धनग्न आणि बेशुद्धावस्थेत एक महिला आढळल्यानंतर गाडीत एकच गोंधळ उडाला. महिलांनी साखळी खेचत ही गाडी मुलुंडला थांबवली. अखेर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे कर्मचारी यांनी धाव घेत या महिलेला कपडे पुरवत तिच्या विनंतीनुसार तिची रवानगी कल्याणकडे केली. मात्र, या प्रकरणाची कोणतीही नोंद अथवा बेशुद्धावस्थेत असलेल्या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्याची दखल यापैकी एकाही यंत्रणेने घेतली नाही.
ठाण्याहून सकाळी ८.२५च्या सुमारास निघालेल्या लोकलच्या महिलांच्या डब्यात साधारण ६० वर्षांची एक महिला अर्धनग्न आणि बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर गाडी थांबवण्यात आली. महिला शुद्धीवर आल्यानंतर तिच्या विनंतीवरून तिला कल्याण लोकलमध्ये बसवून देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 12:05 am

Web Title: semi nude woman on local train spooks passengers
Next Stories
1 चिक्कीखरेदी कंत्राटासाठी नवी योजना
2 बांधकामास अयोग्य जमिनीवरील आरक्षणापोटी ‘टीडीआर’
3 लांबपल्ल्याच्या साधारण श्रेणीचे किमान तिकीट दर आता १० रुपये
Just Now!
X