मुंबईत विसर्जन सोहळ्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. वाहतूकीचा खोळंबा होऊ नये व पादचाऱ्यांचा अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.
यात ४९ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून ५५ रस्त्यांवर वाहतूक एक दिशा असेल. तर, १८ रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे व ९९ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत.
अनंत चतुर्दशी दरम्यान होणाऱ्या विसर्जन मिरवणूकांदरम्यान वाहतूकीचा खोळंबा होऊ नये यासाठी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. यासाठी मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, वांद्रे (स्वामी विवेकानंद मार्ग) आणि पवई (गणेश घाट) येथे पाच नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून ठिकठिकाणी उभारलेल्या टेहळणी मनोऱ्यांद्वारे मिरवणूकांचे नियंत्रण करण्यात येणार आहे.
तसेच, वाहतूक पोलीस विविध स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेणार आहे. यात अनिरूद्ध बापू आपत्कालिन व्यवस्थापन व्यवस्थापनाचे ६ हजार स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे ९०० विद्यार्थी, स्काऊट आणि गाईडचे ३०० विद्यार्थी, गृहरक्षक दलाचे २५० जवान, ३९० वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दलाचे १०० शिक्षक, राष्ट्रीय छात्रसेनेचे ४०० विद्यार्थी, जल सुरक्षा दलाचे ५०० स्वयंसेवक, हॅम रेडिओचे ३५ स्वयंसेवक, ३ हजार ५३६ वाहतूक पोलिस, सशस्त्र दलाचे १०० जवान आणि काही महाविद्यालयीने विद्यार्थी आदी सगळे वाहनांचे व मिरवणुकांचे नियमन करण्यासाठी पोलिसांना मदत करणार आहेत. या व्यतिरिक्त वाहतूक पोलिसांतर्फे गणेश विसर्जन स्थळी बंद पडलेली व वाळूत रूतलेली वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेन्सचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर प्रथमोपचार केंद्र व रूग्णवाहिकांची सोय काही स्वयंसेवी संस्थानी केली असून सेंट जॉन हॉस्पिटल, सैफी रूग्णालय, मुस्लिम व पारशी समाज आदींकडूनही रूग्णवाहिकांची सेवा पुरवण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतूक पोलिसांनी पत्राद्वारे दिली. या वेळी विसर्जन सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांनी स्वयंसेवक व पोलिसांना सहाय्य करावे असे आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले.
वाहतुकीस बंद असलेले प्रमुख रस्ते
दक्षिण विभाग
- कुलाबा वाहतूक विभाग
- नाथालाल पारेख मार्ग
- पायधुनी वाहतूक विभाग
- जिनाभाई मुलजी राठोड मार्ग
- काळबादेवी वाहतूक विभाग
- जे. एस. एस. रस्ता
- आर. आर. रस्ता
- सी. पी. टँक रस्ता
- मलबार हिल वाहतूक विभाग
- जगन्नाथ शंकर शेठ मार्ग
- सरदार वल्लभभाई पटेल मार्ग (स्टॅण्डहर्स्ट मार्ग)
- भायखळा वाहतूक विभाग
- डॉ. बी. ए. रस्ता
- डॉ. एस. एस. रस्ता
- साने गुरूजी मार्ग
- भोईवाडा वाहतूक विभाग
- जेरबाई वाडिया मार्ग
पूर्व उपनगरे विभाग
- दादर वाहतूक विभाग
- रानडे मार्ग
- शिवाजी पार्क पथ क्रमांक ३
- शिवाजी पार्क पथ क्रमांक ४
- माटुंगा वाहतूम्क विभाग
- टिळक पूल
- घाटकोपर वाहतूक विभाग
- लाल बाहदूर शास्त्री मार्ग,
- कुर्ला (प.)
- मुलुंड वाहतूक विभाग
- लाल बाहदूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प.)
- लाल बाहदूर शास्त्री मार्ग ते टँक रस्ता जंक्शन (शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद)
- पश्चिम उपनगरे विभाग
- सांताक्रूझ वाहतूक विभाग
- लिकिंग रस्ता
- जुहू रस्ता
- जुहू – तारा रस्ता
- दिंडोशी वाहतूक विभाग
- आरे कॉलनी रस्ता
- कांदिवली वाहतूक विभाग
- एस. व्ही. रस्ता, एम. जी. रस्ता, कांदिवली (प.)
प्रमुख एक दिशा मार्ग
दक्षिण विभाग
- मलबार हिल वाहतूक विभाग
- फ्रेंच पूल
- वाळकेश्वर मार्ग
- ताडदेव वाहतूक विभाग
- केनेडी पूल
- ग्रॅन्टरोड पूल
- जावजी दादाजी मार्ग
- (ताडदेव रस्ता)
- नागपाडा वाहतूक विभाग
- मुंबई सेंट्रल पूल
- डॉ. भडकमकर मार्ग
- चिंचपोकळी जंक्शन ते चिंचपोकळी पूल
- भोईवाडा वाहतूक विभाग
- महादेव पालव मार्ग
- (करीरोड रेल्वे उड्डाणपूल)
- जगन्नाथ भातणकर मार्ग (एलफिस्टन रेल्वे उड्डाणपूल)
- वरळी वाहतूक विभाग
- डॉ. अॅनी बेझंट मार्ग
- ना. म. जोशी मार्ग
पूर्व उपनगरे
- दादर वाहतूक विभाग
- वीर सावरकर मार्ग
- एस. के. बोले मार्ग
पश्चिम उपनगरे
- सांताक्रूझ वाहतूक विभाग
- जुहू मार्ग
- यारी रस्ता
- सिझर मार्ग, अंधेरी (प.)
- वर्सोवा मार्ग
- बोरीवली वाहतूक विभाग
- लोकमान्य टिळक विभाग
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 15, 2016 12:01 am