मुंबई : मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (सीएसएमआयए) देशांतर्गत व विदेशा जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबई विमानतळावरून एप्रिल २०२४ मध्ये ४३ लाख ६० हजार प्रवाशांनी प्रवास केला. एप्रिल २०२३ तुलनेत यात ९ टक्क्यांनी वाढ झाली असून एप्रिल २०२२ च्या तुलनेत ही वाढ ४२ टक्के आहे.

मुंबई विमानतळाने एप्रिल २०२४ मध्ये १९ हजार ८९२ देशांतर्गत, तर ६ हजार ९७८ आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी एकूण २६ हजार ८७० विमानांची ये-जा झाली. एप्रिल २०२२ (२१,५९७) च्या तुलनेत यात २४ टक्क्यक्नी आणि एप्रिल २०२३ (२५,४७७)च्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढ झाली. १४ एप्रिल रोजी या एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली. तब्बल एक लाख ५६ हजार ७९३ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये एक लाख १३ हजार ५४० देशांतर्गत आणि ४३ हजार २५३ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 percent increase in the number of passengers at mumbai airport mumbai print news amy
First published on: 18-05-2024 at 23:38 IST