Premium

मुंबई: मागाठाणे मेट्रो स्थानकातील प्रवेशद्वार दोन महिन्यानंतर खुले

‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेतील बोरिवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार अखेर दोन माहिन्यांनंतर खुले करण्यात आले.

Magathane Metro station entrance
हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याची माहिती एमएमएमओसीएच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेतील बोरिवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार अखेर दोन माहिन्यांनंतर खुले करण्यात आले. त्यामुळे आता मेट्रो प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

जुलैमध्ये मागाठाणे मेट्रो स्थानकालगत एका खासगी विकासकाच्या कामादरम्यान रस्ता खचल्याची घटना घडली होती. मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारालगत हा रस्ता असल्याने मेट्रो स्थानकाचा काही भाग बाधित झाला होता. त्यामुळे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) जुलैमध्ये बाधित परिसर बंद केला होता. स्थानकाच्या उत्तरेकडील एका प्रवेशद्वाराचा त्यात समावेश होता.

आणखी वाचा- विद्यापीठाचे सरकारकडे बोट; निवडणूक स्थगितीप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

या घटनेनंतर मेट्रो स्थानकातील बाधित परिसराची आयआयटीकडून तपासणीही करण्यात आली होती. दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने या रस्त्याची, परिसराची दुरुस्ती केली. मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वारही आता सुरक्षित झाले आहे. त्यामुळे हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याची माहिती एमएमएमओसीएच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Entrance at magathane metro station opened after two months mumbai print news mrj

First published on: 13-09-2023 at 11:28 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा