मुंबई : रस्ते कॉंंक्रिटीकरणाच्या आधीच्या कंत्राटातील कामे रखडलेली असताना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आणखी हजारो कोटी रुपयांच्या कामांसाठी मागवलेल्या निविदांना १५ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. शहर भागासाठी एक, पूर्व उपनगरासाठी एक आणि पश्चिम उपनगरासाठी तीन निविदा मागवण्यात होत्या. या कामांसाठी कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. ही कामे सुमारे सहा हजार कोटी रुपयांची आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी सुमारे ६,०७८ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारीत कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीमध्ये रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. ही रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच शहर भागातील कंत्राटदाराने एकाही रस्त्याचे काम सुरू न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर नुकतेच शहर भागातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया सुरू असताना फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण मुंबईतील ४०० किमीच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा कसा मिळाला? सर्वोच्च न्यायालयाने काय कारण दिले?

हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे पालिकेने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत दरवर्षी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जात होते. मुंबई एकूण सुमारे २०५० किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी १२२४ किमी लांबीच्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र गेल्या वर्षभरातील कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा वेग अतिशय कमी आहे.

कोणत्या भागासाठी किती कोटींच्या निविदा

शहर – ११४२ कोटी रुपये
पूर्व उपनगर – १२२४ कोटी रुपये
पश्चिम उपनगर – ८६४ कोटी रुपये
पश्चिम उपनगर – १४०० कोटी रुपये
पश्चिम उपनगर – १५६६ कोटी रुपये

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai response of 15 contractors for new road concreting works mumbai print news ssb