नागपूर : कामठी येथील बिसन गोंडाणे यांच्या घरी एकच नाही तर तब्बल सव्वीस साप निघाल्याने खळबळ उडाली. दरम्यान, सर्पमित्राला बोलावून या सर्व सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

वाइल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य सर्पमित्र सागर चौधरी यांना २४ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता भिलगाव, कामठी येथीन बिसन गोंडाणे यांनी घरी साप दिसून येत असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. सागर चौधरी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी साप पकडण्यास सुरुवात केली. यावेळी जमिनीतून थोडा गाळ काढल्यानंतर सागरने सापांना पाहिले. हे साप बिनविषारी आणि पांदीवड प्रजातीचे साप होते.

हेही वाचा…गीतांजली एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग….

खूप मेहनतीनंतर एक-एक करून तब्बल सव्वीस साप पकडले. या सर्व सापांना प्लास्टिकच्या बरणीत भरल्यानंतर गोंडाणे यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. पकडलेल्या सापाच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.