यवतमाळ : वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेने आंदोलन करून निषेध नोंदविला. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने येथील माईंदे चौकात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय वडेट्टीवार यांच्या पोस्टरला चपलांचा हार घालून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी झाला नव्हता, असे विधान करून देशभक्त हेमंत करकरे यांच्या शहीद होण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस, नागरिक यांच्यासह समस्त भारतीयांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा – ग्रामीण भाषाशैली, वैदर्भीय स्टारप्रचारकाने महाराष्ट्र गाजवला

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असून सरकारने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

हेही वाचा – पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष! मेळघाटातील हे गाव आहे २८ वर्षांपासून टँकरग्रस्‍त; महिलांना…

आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन महल्ले, युवा सेना विधानसभा अध्यक्ष सुशांत इंगोले, महिला आघाडी जिल्हा संघटिका वैशाली मासाळ, उत्तम ठवकर, मनोज नाले, अभी पांडे, मनोज भोयर, योगेश वर्मा, आदी सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A necklace of shoes for vijay wadettiwar poster shivsena protests in yavatmal nrp 78 ssb
Show comments