अकोला: सोयाबीनसह अन्य पिकांना अमरवेल तणाचा मोठा धोका असतो. या तणाचे वेळीच निर्मूलन न केल्यास १०० टक्के नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. विदर्भातील सोयाबीनवर त्याचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. बिजोत्पादन अवस्थेपूर्वी वेळीच प्रतिबंधात्मक व निवारणात्मक उपाय करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय तण व्यवस्थापन संधोधन प्रकल्पाचे व्ही.व्ही. गौड यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी सोयाबीनच्या  लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही वर्षात अमरवेल परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव द्विदलवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढला. बाल्यावस्थेत ही वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिकटते व जमिनीपासून वेगळी होते. सूक्ष्म तंतूच्या मदतीने वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते, असे गौड यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ट्रॅफिक सिग्नलवर ‘ग्रीननेट’ची सावली, नागपूरकरांचा उन्हापासून…

अमरवेलाचे बी २० वर्षांहून जास्त काळ जमिनीत जिवंत राहू शकते. त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेपूर्वी त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अमरवेल प्रतिदिन साधारण सात से.मी.पर्यंत वाढून जवळपास ३ चौ.मी. क्षेत्र व्यापते. या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे १०० टक्के देखील नुकसान होऊ शकते. मूग व उडीद ३१ ते ३४ टक्के, टोमॅटो ७२ टक्के, हरभरा ८५.७ टक्के व मिरची पिकामध्ये ६० ते ६५ टक्के उत्पादनात घट आढळून आली आहे.

अमरवेल तणाच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक, निवारणात्मक उपाय तसेच रासायनिक पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणरहित बियाण्यांचा वापर, पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर, शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून अथवा जाळून नष्ट करावे, जमिनीची खोल नांगरणी करावी, जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे, नियमित डवरणी व निंदण करून पीक तणरहित ठेवावे, पिकांची फेरपालट करावी, प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी आदींसह रासायनिक व्यवस्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>उपराजधानीत मेंदूमृत अवयवदात्यांची संख्या दीडशेवर; चालू वर्षात उच्चांकाकडे वाटचाल

तणाच्या सुमारे १७० प्रजाती

अमरवेल हे कंदमुळे वर्गातील पर्णहीन पिवळसर रंगाचे तण आहे. तणाच्या सुमारे १७० प्रजाती आहेत. हे तण पूर्ण परोपजीवी असून, द्विदल तणांवर वनस्पतींवर अवलंबून राहते. परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकासोबत द्विदल तणावर देखील स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amarvel weed threat to soybeans and other crops akola ppd 88 amy