सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र, फटाके, वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, ढगाळ वातावरण त्यामुळे वाढणारे ओझोनचे प्रमाण दिवाळीत अस्थमा, सीओपीडी, फुफ्फुस विकारांसह श्वसनरोगाचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

याबाबत क्रिम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक अरबट म्हणाले, करोनामुळे सलग दोन वर्षे दिवाळीत फटाके कमी फुटले. यंदाचा उत्साह बघता फटाके मोठ्या प्रमाणात फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी न घेतल्यास नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांचे रुग्ण वाढू शकतात. करोनातून बाहेर पडल्यावर आपल्या श्वसनयंत्रणेची आणि पर्यायाने फुफ्फुसांची काळजी आपणच घेतली पाहिजे. दिवाळीची स्वच्छता, रंगरंगोटी, अगरबत्ती व घरात जाळायचे फटाके यामुळे जे घरात प्रदूषण होते त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

what is heatwave in marathi
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो?
hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?

हेही वाचा : नागपूर: पुन्हा चार ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब

दमा व श्वसनविकार असलेल्यांनी या दुर्लक्षित प्रदूषणाची जाणीव ठेवून विशेष काळजी घेतली पाहिजे. याशिवाय वातावरणातील प्रदूषण हे सातत्याने वाढत आहे. कारखाने, मोठी मोठी बांधकामे यामुळे कणांचे प्रदूषण वाढते. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी ते हानीकारक आहे. दिवाळीच्या फटाक्यांच्या धुरातून सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि अन्य विषारी घटक निघतात. त्यामुळे सर्दी-खोकला, दमा, सीओपीडी, इंटरस्टेशियल लंग्स डिसिज, ज्यांना कोविड होऊन गेलाय असे रुग्ण, कोविड फायब्रोसिसचे रुग्ण, अशा फुफ्फुसाची व श्वासांशी संबंधित रुग्णांना या धुराचा त्रास होतो. त्यामुळे त्यांनी या धूरापासून लांब राहिले पाहिजे, असेही डॉ. अरबट म्हणाले.

हेही वाचा : नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाचे शक्तीप्रदर्शन; विविध प्राधिकरणांच्या लवकरच निवडणुका

ऋतू बदलतो, तेव्हा आपल्या शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यास वेळ लागतो. त्यावेळी श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. ताप, अंगदुखी, सर्दी यांचेही प्रमाण वाढते. लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम होतो. त्यामुळे सगळ्यांनी जास्त काळजी घ्यावी, असे ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ म्हणाले.