अमरावती : मेळघाटातील धारणी शहरातील शिक्षक बँकेजवळ एका घरामध्ये वाणिज्यिक वापराच्या सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याने त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. शेजारच्या एका घराचेसुद्धा अल्प प्रमाणात नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. धारणी येथील सिव्हिल लाईन परिसरात राहणारे अशोक श्रीराम सोनी यांचा सराफा व्यवसाय आहे. सकाळी ९ वाजता त्यांच्या घरात असलेल्या वाणिज्यिक वापराच्या गॅस सिलेंडरचा अचानक भडका उडाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “एकाही वरिष्ठ नेत्याने वर्धेची जागा काँग्रेसने लढावी म्हणून स्वारस्य दाखविले नाही,” कोण म्हणाले असे पक्षाध्यक्ष खर्गे यांच्यासमोर?

सिलेंडरच्‍या स्‍फोटानंतर काही क्षणात सोनी यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. यामध्ये जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे बाजूला राहणाऱ्या श्रीकृष्ण श्रावण खंडारे यांच्या घरालासुद्धा या आगीच्या झळा लागल्याने साहित्य जळून सुमारे एक लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मेळघाट क्षेत्राचे आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्‍यात आले. जिल्‍ह्यातील नांदगाव खंडेश्वर  शहरात बसस्थानकासमोरील बिसनसिंह गुमानसिंह राजपुरोहित यांच्या श्री बालाजी बिकानेर मिठाईवाला या दुकानाला आग लागली. ही घटना कळताच गावकरी मदतीसाठी धावून गेले. पोलिसांना ही माहिती कळताच ठाणेदार सुनील सोळंके, गणेश खंडारे व पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. नांदगाव नगरपंचायत अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. मदतीला धावून आलेल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आग ताबडतोब आटोक्यात आणल्याने या आगेची झळ आजूबाजूला पोहोचली नाही व अनर्थ टळला. आगीचे कारण कळू शकले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commercial gas cylinder blast in amravati district mma
Show comments