देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सुरू झालेल्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये (महाज्योती) कोटय़वधींचा ‘टॅबलेट’ घोटाळा झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. महाज्योतीने १० ते ११ हजार रुपये प्रति ‘टॅबलेट’ बाजारमूल्य असलेले ६ हजार ‘लेनोवो टॅबलेट’ प्रति १८ हजार ८९९ रुपयांना विकत घेऊन ४ कोटी ८० लाखांचा भ्रष्टाचार केल्याचे दिसून येते.

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक विकासाकरिता ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेची स्थापना ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. मात्र, संस्थेच्या स्थापनेपासूनच विविध उपक्रम वादात सापडले आहेत. त्यात आता ६ हजार ‘लेनोवो टॅबलेट’ खरेदीमध्ये कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. ‘महाज्योती’कडून ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससीसह’ ‘जेईई’, ‘नीट’ आदी परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, करोनाकाळात ऑनलाइन प्रशिक्षण सुरू असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘टॅबलेट’ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यासाठी सरकारी ई-मार्केटप्लेस (जेईएम) या संकेतस्थळावर ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.

माहिती अधिकारानुसार, निविदेनंतर संबंधित कंपनीकडून ‘महाज्योती’ने ६ हजार ‘लेनोवो टॅबलेट’ विकत घेतले. या सहा हजार टॅबलेटसाठी ‘महाज्योती’ने सर्व प्रकारचे कर जोडून ११ कोटी ३३ लाख ९४ हजार रुपये संबंधित विक्रेत्याला दिले. यानुसार महाज्योतीने प्रति टॅबलेट १८ हजार ८९९ रुपयांना विकत घेतले. हा करार सप्टेंबर २०२१ दरम्यान झाला असून ‘महाज्योती’ने विद्यार्थ्यांना दिलेल्या ‘लेनोवो टॅबलेट’च्या आज आणि तेव्हाच्या किमतीची चौकशी केली असता ती १० ते ११ हजार रुपयांवर नाही. त्यात सहा हजार ‘टॅबलेट’ विकत घेणार असल्यास कुठलीही कंपनी त्यावर सवलत देईल हे निश्चित होते. असे असतानाही ‘महाज्योती’ने अकरा हजारांना मिळणारे ‘लेनोवो टॅबलेट’ १८ हजार ८९९ रुपयांना विकत घेतले. त्यामुळे ४ कोटी ८० लाख रुपये विक्रेत्याला अधिक देण्यात आले. बाजारमूल्यापेक्षा अधिकचे पैसे देऊन ‘महाज्योती’ने ‘टॅबलेट’ विकत घेतल्याने संचालक मंडळाने विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांमधून कोटय़वधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

अन्य विक्रेते काय म्हणतात ?

‘महाज्योती’ने विद्यार्थ्यांना ‘लेनोवो टॅबलेट एम ८’ हे मॉडेल दिले. त्यात ३ ‘जीबी रॅम’ तर ३२ ‘जीबी रोम’ आहे. त्यामुळे ‘लेनोवो टॅबलेट’च्या या मॉडेलची माहिती उपराजधानीतील काही विक्रेत्यांकडून घेतली असता त्यांनीही या ‘टॅबलेट’ची किंमत दहा ते अकरा हजारच असल्याचे सांगितले. शिवाय इतक्या मोठय़ा संख्येने टॅबलेट विकत घेतल्यास किंमत अजून कमी होऊ शकते, ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’वर ही किंमत १० हजार ९००च्या घरात आहेत. त्यामुळे ‘महाज्योती’ने या विक्रेत्यांकडून महागडे टॅबलेट का विकत घेतले, हा प्रश्न आहे.

संपूर्ण निविदा प्रक्रिया सरकारी ई-मार्केटप्लेस (जेईएम) वरून पार पडली. त्यामुळे त्यात कुठलाही गोंधळ होण्याची शंका नाही. शिवाय विद्यार्थ्यांना ‘टॅबलेट’सोबत इतर साहित्यही देण्यात आल्याने किंमत अधिक आहे. – प्रदीपकुमार डांगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती