पुणे : भारतामध्ये एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी एक आघाडीची खासगी कंपनी टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने (टीएएसएल) पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे रोजी वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टीएएसएलच्या हैदराबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या पिंपरीतील हॉटेल कॅरिअडमध्ये होणार आहेत.

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड हैदराबाद आणि पुणे प्रकल्पात एनसी प्रोग्रामरची भरती करणार आहे. उमेदवारांनी कॅड/कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला हैदराबाद प्रकल्पासाठी ऑपरेटर असेम्ब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना ३ ते ६ वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत.

हेही वाचा : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं ‘उड्डाण’ कशामुळं रखडलं? अखेर समोर आलं कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक पातळीवरील आघाडीच्या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांसोबत भागीदारी करून टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतील एक अविभाज्य सहयोगी आहे. आघाडीच्या डिफेन्स ओईएम कंपन्यांसाठी ही कंपनी ग्लोबल सिंगल सोर्स प्रोव्हायडर आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने म्हटले आहे की, कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देते. सर्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक सेवासुविधा उत्पादने विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या ज्ञान व अनुभवाचा वापर करता यावा यासाठी पूरक वातावरण पुरवण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.