नागपूर : राज्यात १ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ या चार महिन्याच्या कालावधीच्या तुलनेत १ जानेवारी २०२४ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत चौपट वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालातून ही आकडेवारी पुढे आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एडीस’ जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा चिकनगुनिया हा रोग एका विशिष्ट विषाणूपासून होतो. राज्यातील सर्व जिल्हे व महापालिका हद्दीत १ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान चिकनगुनियाच्या ४ हजार १९३ संशयित रुग्णांच्या तपासणीपैकी ९७ रुग्णांमध्ये या आजाराचे निदान झाले. १ एप्रिल २०२४ ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान राज्यात ५ हजार ८१६ संशयितांपैकी ४०० रुग्णांमध्ये चिकनगुनियाचे निदान झाले. त्यामुळे मागील वर्षीहून हे रुग्ण चारपट वाढलेले दिसत आहे.

आणखी वाचा-लाडकी प्रेयसी बोलेना, हळव्या प्रियकराचे डोके सटकले अन् त्याने दुकानच पेटवले…

राज्यातील सर्व महापालिका भागात १ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान ३ हजार ४३९ संशयितांपैकी ४० रुग्णांमध्ये तर १ जानेवारी २०२४ ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान ३ हजार ६०६ संशयितांपैकी १२५ रुग्णांमध्ये चिकनगुनियाचे निदान झाले. राज्यातील महापालिका भाग वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान ७५४ संशयितांपैकी ५७ रुग्णांमध्ये तर १ जानेवारी २०२४ ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान २ हजार २१० संशयितांपैकी २७५ रुग्णांमध्ये चिकनगुनियाचे निदान झाले. या आकडेवारीला आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

चिकनगुनिया रुग्णांची स्थिती (महापालिका क्षेत्र) (जानेवारी ते एप्रिल दरम्यान)

महापालिका २०२३ २०२४ (१४ एप्रिलपर्यंत)
अकोला ०३३६
सांगली ०५३५
बृहन्मुंबई ०८२०
नाशिक ०२ १०
कोल्हापूर १४ १०
पुणे ०२ ०९
अमरावती ०१ ०४
सोलापूर ०४ ०१

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four fold increase in the number of chikungunya patients in the state mnb 82 mrj