विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन 

नागपूर : विज्ञान अवघड नाही. ते आपल्याला वारसारूपाने मिळालेले आहे आणि ते आपल्यात आहे. दोन हजार वर्षे उलटून गेलेली स्मारके अजूनही आपल्याकडे आहेत, जी खराब झालेली नाहीत. मात्र, याच भारतात विज्ञानाचा बराच अभ्यास होऊनही तो प्रकाशित झाला नाही, असे प्रतिपादन सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी केले.

Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?

‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे : भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राप्ती’ या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी केंद्राचे प्रकल्प समन्वयक मनोजकुमार पांडा होते. विज्ञानाचा उपयोग लोकांच्या विकासासाठी केला जातो. म्हणूनच जीवनमानही पूर्वीच्या तुलनेत उंचावले आहे. हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी भावी पिढीची आहे, असेही डॉ. वैद्य म्हणाले. विज्ञान संग्रहालयाची राष्ट्रीय परिषद (एनसीएसएम), विज्ञान प्रसार, केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्या सहकार्याने ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे : भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राप्ती’ यावर देशव्यापी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.

 या प्रदर्शनाचे उद्घाटन देशातील ७५ ठिकाणी एकाचवेळी करण्यात आले. हे प्रदर्शन अतिशय माहितीपूर्ण असून दृकश्राव्य माध्यम तसेच रेखाटनाच्या सहाय्याने कथा सांगितल्या आहेत. भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साडेसात दशकांचा चित्तथरारक प्रवास या प्रदर्शनातून उलगडण्यात आला आहे. हे प्रदर्शन भारताचा विकास आणि शोध यांच्या महत्त्वाच्या खुणा अधोरेखित करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सार्वजनिक समज वाढवते. समाजात विज्ञानाविषयी जागरूकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण करते. यातील कथा सर्वसमावेशक नसून केवळ सूचक आहेत. २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनाला प्रदर्शनाचा समारोप होईल.

सर्व विभागांचा समावेश

या प्रदर्शनात भारताचा वैज्ञानिक वारसा, भारताचे स्वातंत्र्य, शेती, सिंचन, अवजड उद्योग, रासायनिक उद्योग, मध्यम आणि लघु उद्योग, ऊर्जा उत्पादन, अणुऊर्जा क्षमता, ग्रामीण विकास आणि योग्य तंत्रज्ञान, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र, अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण संशोधन, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स क्रांती, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान आणि आरोग्य सेवा, करोना लसीकरण : यशोगाथा, जैवतंत्रज्ञान, समुद्रशास्त्र, वाहतूक, हवामान बदल आणि पर्यावरण, मानव संसाधन आदी विभागांचा समावेश आहे.