लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : बाजारातून खरेदी केलेले मटण सोबत घेऊन मेट्रोने जाण्यासाठी स्थानकावर आलेल्या प्रवाशाला सुरक्षारक्षकाने रोखल्याने संतापलेल्या प्रवाशाने मित्रांच्या मदतीने सुरक्षारक्षकालाच बेदम मारहाण केली. ही घटना अग्रसेन मेट्रो स्थानकावर घडली. त्याची तक्रार गणेशपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाने पोलीस व महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

मेट्रोने प्रवास करताना काही वस्तू प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांकडे असलेल्या वस्तूंची सुरक्षा रक्षकाकडून तपासणी केली जाते. १५ मार्च रोजी अग्रसेन मेट्रो स्थानकावर एक व्यक्ती मटण घेऊन जात असताना सुरक्षारक्षक जयनारायण कुथे यांनी त्याला रोखले. मेट्रोत असे पदार्थ नेण्यास प्रतिबंध असल्याचे सांगत त्यांनी नियमांची माहिती करून दिली. मात्र प्रवासी संतापला व त्याने मित्रांना बोलवून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ व मारहाण केली मारहाण केली.

आणखी वाचा- चंद्रपूर : गारपिटीसह अवकाळीचा पिकांना फटका; हरभरा, मक्का, ज्वारी व मिरचीचे मोठे नुकसान

यापूर्वीही मेट्रो स्थानकावर सुरक्षारक्षकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. यामुळे मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून महामेट्रोने याची दखल घ्यावी, व सबंधित व्यक्तीला अटक करावी , अशी मागणी नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाने केली. तसे पत्र त्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security guard assaulted at nagpur metro station cwb 76 mrj
Show comments