Premium

यवतमाळ : बापरे! त्यांनी चोरल्या अकरा दुचाकी; तक्रार दाखल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमणात वाढले आहे. या चोरीमागचे मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

11 stolen bikes were seized by the police
11 दुचाकी चोरांना पोलिसांनी पकडले आहे.

यवतमाळ : शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमणात वाढले आहे. या चोरीमागचे मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत पाच लाख २५ हजार रुपये आहे. ही कारवाई अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. श्रीकृष्ण उर्फ शिर्या सोळंकी (२५, रा. शिवाजी चौक, कळंब), सुरेश उर्फ विकास दत्तराव सुरोशे (३३, रा. करंजी, रा. यवतमाळ), अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ फेब्रुवारी रोजी रुपराव मधुकर पोहेकर, रा.पिंपळगाव यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक पेट्रोलिंगवर असताना श्रीकृष्ण उर्फ शिऱ्या हा एक दुचाकी घेऊन वडगाव नाका येथील चहा कॅन्टीनवर असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याकडील दुचाकीबद्दल विचारपूस केली. त्याने सदर दुचाकी एकविरा चौकातून चोरी केल्याची कबुली दिली. साथीदार सुरेश उर्फ विकास याच्यासह बाभूळगाव, यवतमाळ व इतर ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दोघांनाही ताब्यात घेवून त्यांच्याकडून पाच लाख २५ हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या एकूण ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोघांकडून इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stolen 11 bikes as soon as the complaint was filed the police arrested nrp 78 ysh

First published on: 30-05-2023 at 12:56 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा