अमरावती : चिखलदरा येथे जात असलेल्‍या पर्यटकांची कार २०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्‍या भीषण अपघातात तीनजणांचा जागीच मृत्‍यू झाला, तर चारजण गंभीररीत्‍या जखमी झाले आहेत. हा अपघात परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावानजीक रविवारी सकाळी घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातग्रस्‍त कारमधील प्रवासी हे तेलंगणातील आदिलाबाद येथील रहिवासी होते, अशी माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस घटनास्‍थळी पोहोचले. जिल्‍हा आपत्‍ती प्रतिसाद दलदेखील पोहोचले असून जखमी प्रवाशांना रुग्‍णालयात हलविण्‍यात आले आहे. मृतांची आणि जखमींची नावे कळू शकलेली नाहीत.

हेही वाचा – चंद्रपूर : सिंदेवाही जंगलात ओडीसातील हत्तीचा मुक्काम, पिकांचे नुकसान

हेही वाचा – कुख्यात ‘शिनू’ टोळीविरुध्द मोक्का; यवतमाळसह नागपुरात खुनाचे पाच गुन्हे

तेलंगणातील पर्यटक एपी २८/ डीडब्‍ल्‍यू २११९ क्रमांकाच्‍या अर्टिगा कारने चिखलदरा येथे जात असताना रविवारी सकाळी ७.३० वाजताच्‍या सुमारास हा अपघात घडला. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दरीत कोसळल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The car of the tourists going to chikhaldara fell into the valley three dead and four injured mma 73 ssb
First published on: 17-09-2023 at 12:18 IST