यवतमाळ : येथील कुख्यात शिनू शिंदे टोळीविरुद्घ ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. मोक्का प्रकरणातील या टोळीविरुद्ध यवतमाळ शहरात चार व नागपूर येथे एक अशा एकूण पाच खुनाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. रोशन उर्फ ज्ञानेश्‍वर रमेश मस्के (रा. बोरूंदियानगर) याच्यावर चाकूने मानेवर व डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना २६ जून रोजी नागपूर बायपासवर उघडकीस आली होती. या प्रकरणी रमेश श्रावण मस्के (रा. बोरूंदियानगर) यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपासात राहुल उर्फ शिून संजय शिंदे (२३, रा. ताडउमरी, ता. केळापूर), शेख रहिम उर्फ शेरअली मोती सय्यद (२४, रा. इंदिरानगर), नयन सुरेश सौदागर (२८, रा. विठ्ठलवाडी), करण संजय शिंदे (२४, रा. ताडउमरी), वेदांत संतोष मानकर (२०, रा. पाटीपुरा), देवांश अजय शर्मा (२४, रा. माळीपुरा), फारूख खान उर्फ मुक्का बशीर खान (२५, रा. इंदिरानगर), अजिंक्य किन्हेकर (२२, रा. वाघापूर) यांच्यासह अन्य चार विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग निष्पन्न झाला.

हेही वाचा : मोसमी पावसाचा परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदाही लांबणीवर

टप्प्याटप्प्यात त्यांना अटक करण्यात आली. हा गुन्हा कट रचून व संघटितरित्या केला. त्यामुळे महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कलम वाढीची परवानी मिळण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्याकडे यवतमाळ शहर पोलिसांनी तयार केलेला प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठविण्यात आला. या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी देण्यात आली. या गुन्ह्यात मोक्काचे कलम समाविष्ट करण्यात आले. पुढील तपास पुसदचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

हेही वाचा : बुकी सोंटूच्या बँक खात्यातून १०० कोटींचा व्यवहार

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधासिंग सोनोने, अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते, यवतमाळ शहर ठाणेदार सतीश चवरे, उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोस, सपोनि प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघट, विजय पतंगे, दत्ता पवार, रवी नेवारे, अंकुश फेंडर आदींनी केली.

हेही वाचा : नक्षल चळवळीला हादरा, जहाल नक्षलवादी संजय राव आणि त्याच्या पत्नीला अटक, विविध राज्यांत होते २ कोटींचे बक्षीस

चार सराईतांविरुद्घ ‘एमपीडीए’

जिल्ह्यातील यवतमाळ शहर, अवधूतवाडी व उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्घ, मालमत्तेविरुद्घ गुन्हे करून दशहत पसरविणार्‍या चार सराईतांविरुद्घ एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांना अकोला येथील कारागृहात स्थानबद्घ करण्यात येणार आहे. यात अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील अभय उर्फ बित्तम उर्फ विकास दिलीप पातोडे (२२, रा. शिंदेनगर), यवतमाळ शहर हद्दीतील साहिल अली मुज्जफर अली (२३, रा. रामरहिमनगर), उमरखेड हद्दीतील आकाश रविप्रसाद दीक्षित (२२, रा. शिवाजी वार्ड, उमरखेड), विजय गणेश भिमेवार (२१, रा. शिवाजी वार्ड) यांचा समावेश आहे. एमपीडीएकायद्यांतर्गत जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcoca on shinu shinde gang for 5 murders in yavatmal and nagpur nrp 78 css
First published on: 17-09-2023 at 11:28 IST