बुलढाणा : दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराची वानवा असताना तब्बल ५६१ ग्रामपंचायतीमध्ये रोहयो ची कामेच सुरू नाहीये! यामुळे कामाच्या शोधात असलेल्या हजारो मजुरांची दैना होत असल्याचे दुर्देवी चित्र आहे.पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम उध्वस्त झाला. सोयाबिन, कपाशी या मुख्य पिकासह सर्व पिकांच्या एकरी उत्पादनात ४० टक्के घट आली. त्यातच हाती आलेल्या पिकांना मातिमोल भाव मिळत आहे. रब्बी पिकांनाही अवकाळी पावसाचा तडाखा मिळाला. यामुळे शेतीत कामे नसल्याने रोहयो ची कामे हाच मजुरांचा आधार आहे. मात्र जिल्ह्यातील ८८९ पैकी ५६१ ग्रामपंचायत क्षेत्रात मनरेगा ची कामेच सुरू नसल्याने मजुरांची स्थिती बिकट झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in