अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचा १५ फेब्रुवारीचा महाराष्ट्रातील अकोला, औरंगाबादचा नियोजित दौरा स्थगित करण्यात आला आहे. आता ते १८ किंवा २२ फेब्रुवारीला दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपसह शिंदे गटाचे खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. निवडणुकांच्या अगोदरच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रमुख पक्षांचे लक्ष्य आहे. निवडणुकीसाठी जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पश्चिम विदर्भातील भाजपचा गड म्हणून ओळख असलेला अकोला लोकसभा मतदारसंघात देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह १५ फेब्रुवारी रोजी येणार होते. मात्र, त्यांचा हा पूर्वनियोजित दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती भाजपतील सूत्रांनी दिली. आता ते १८ किंवा २२ फेब्रुवारीला महाराष्ट्रात येणार असल्याचे कळते.

हेही वाचा – वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांचे एक्स खाते हॅक, पोलिसांत तक्रार दाखल

हेही वाचा – यवतमाळ : घर, भूखंडाचे कागदपत्र अडवून अवैध सावकारी; उमरखेड येथे सहकार विभागाचा छापा, सावकाराकडून १६१ कागदपत्रे जप्त

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम व वर्धा लोकसभा मतदारसंघाचा अमित शाह आढावा घेणार आहेत. पक्षाच्या संचलन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, २० संघटनमंत्री, विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधी आदींचा ते वर्ग घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित शाह यांच्या पुढील आठवड्यातील दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union home minister amit shah maharashtra tour postponed the possibility of coming on this day ppd 88 ssb