नागपूर: ‘जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार’, अशा कठोर शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीवादावर भाष्य केले.गांधीवादी विचारक रघू ठाकूर यांच्या ‘गांधी- आंबेडकर कितने दूर कितने पास’ या पुस्तकाचे लोकार्पण प्रेस क्लबच्या सभागृहात शनिवारी झाले. याप्रसंगी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात विविध जातींची आंदोलने होत आहेत. त्यापैकी बरेच शिष्टमंडळ मला येऊन भेटतात. मी कधीही जात- पात मानली नाही. त्यामुळे या चुकीच्या राजकारणातून समाज व देशाचा विकास शक्य नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आंदोलनात घर जाळणे, हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यासंदर्भातील गुन्हे मागे घेतले जाणार नाही – देवेंद्र फडणवीस

आजच्या पिढीला भूतकाळातील संघर्षाची माहिती नाही. त्यामुळे आपण घरी एक विचार घेऊन चाललो असलो तरी ही पिढी वेगळाच विचार करताना दिसते. त्यामुळे सगळ्या विचारांमधील मूलभूत गोष्टी लुप्त होणार काय, हा प्रश्न आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशी, स्वावलंबत्व, स्वातंत्रासाठी खूप काम केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. त्यामुळे दोघांतील साम्यांचा विचार सा पुस्तकात आहे, असेही गडकरी म्हणाले. रघू ठाकूर म्हणाले, महात्मा गांधी यांच्याबाबत हल्ली खोट्या गोष्टी बोलल्या जातात. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातही वाद होते, असे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात दोघांची काही मुद्यांवर मतभिन्नता होती. तरी दोघेही एकमेकांचा खूप आदर करायचे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ब्रम्हानंद स्वाई, सुरेशबाबू अग्रवाल, एस. एन. विनोद, नचिकेता शर्मा, मंदाकिनी भिल उपस्थित होते.

हेही वाचा >>> आंदोलनात घर जाळणे, हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यासंदर्भातील गुन्हे मागे घेतले जाणार नाही – देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपुरुषांना समाजाचे लेबल अयोग्य शिवाजी महाराजांना मराठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित , महात्मा ज्योतिबा फुले यांना माळी, टिळकांना ब्राम्हण समाजाचे लेबल लावण्यात आले आहे. हा प्रकार योग्य नाही. राष्ट्रपुरुषांना आपण अशा विवादात टाकल्यास समाजातून मूलभूत गोष्टी नष्ट होतील. सध्या आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे कोणीही आमचा झेंडा घेते. जसे लोक तसे पक्ष आहे, अशी मिश्किल टिप्पणीही गडकरी यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkari comment on casteism in harsh words mnb 82 zws
First published on: 28-01-2024 at 12:24 IST