वाशिम : तालुक्यातील एकबुर्जी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीरीतून गावातील काही घरांना खासगी नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. २४ फेब्रुवारीला रात्री अज्ञात इसमाने विहिरीत विषारी औषध टाकले. आज, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी नळाला पाणी आले असता ते पिवळसर आले व पाण्याचा वास येत असल्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील एकबुर्जी गावातील चाळीस ते पन्नास घरांना खासगी नळ योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. आज सकाळी ९ वाजता नळांना पिवळे पाणी आल्याने नागरिकांना पाईप लाइन मध्ये काही तरी बिघाड झाल्याचा संशय आला. इतक्यात भगवान सीताराम इढोळे हे शेतात गेले असता त्यांना विहिरीत विषारी औषधाच्या बाटल्या आढळून आल्याने पाण्यात कुणीतरी विषारी औषध टाकल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती ११२ वर फोन करून पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार बांगर, पोलीस उप निरीक्षक शेटे पोलीस कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचली. सोबतच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा…नागपूर : कुलगुरू डॉ. चौधरींचे निलंबन, समाजमाध्यमांवर भिडले समर्थक – विरोधक…

सुदैवाने नागरिकांनी नळाचे पाणी वापरले नसल्याने मोठा अनर्थ टळला. प्रशासनाने तातडीने समय सूचकता दाखवून विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात गावातील नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा दिला जात आहे. घडलेला प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून त्या अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unknown person put poison in well at ekburji village in washim pbk 85 psg