Premium

मनमाड : मातेची बालिकेस मारहाण, समाजसेवकाच्या सतर्कतेमुळे सुटका

पाच महिन्याच्या आपल्या मुलीला बेदम मारहाण करणाऱ्या महिलेला जागरुक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून बालिकेची सुटका केली.

Mother beat her daughter
मातेची बालिकेस मारहाण

मनमाड : पाच महिन्याच्या आपल्या मुलीला बेदम मारहाण करणाऱ्या महिलेला जागरुक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून बालिकेची सुटका केली. समाजसेवक विलास कटारे यांनी पोलिसांच्या निदर्शनास सर्व प्रकार आणून दिला. पोलिसांनी परप्रांतात असणाऱ्या महिलेच्या कुटूंबियांशी संपर्क साधून तिला घेऊन जाण्यास सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील कॅम्प भागात रस्त्याच्या कडेला एक महिला तिच्याजवळ असलेल्या लहान बाळाला बेदम मारहाण करत होती. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिला. शंका आल्याने त्यांनी समाजसेवक विलास कटारे यांच्याशी संपर्क साधला. कटारे यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेकडे विचारपूस केली. सदर महिला दक्षिण भारतीय असल्यामुळे तिला भाषा समजत नव्हती. बाळ मारहाणीमुळे जोरजोरात रडत होते. उलगडा होत नसल्याने कटारे यांनी महिलेसह बाळाला घेऊन उपजिल्हा रुग्णालय गाठले. पोलिसांना माहिती दिली. डॉक्टरांनी बाळावर उपचार केले. बाळाच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>> ठेवीदारांना पैसे देणेही कठीण, एनपीए १३४२ कोटींवर; अडचणीतील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी

बाळाला मारहाण करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन दुभाषिकांच्या मदतीने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता महिला उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी महिलेच्या कुटूंबियांशी संवाद साधला. महिलेचे नाव लक्ष्मी मलय्या गंगव्वा (माहुरी, जिल्हा निजामाबाद, तेलंगणा) असे आहे. ती काहीअंशी मनोरुग्ण असून काही वेळा ती घरातून निघून जाते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी कुटूंबियांना तिला घेऊन जाण्यास सांगितले. समाजसेवक कटारे यांनी दाखविलेल्या समयसुचकतेचे शहर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mother beat her daughter rescued due to the vigilance of a social worker ysh

First published on: 30-05-2023 at 10:16 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा