Premium

अपहार प्रकरणी धुळे जिल्ह्यात सरपंच, ग्रामविकास अधिकारी निलंबित

सोनगीर ग्रामपंचायतीत २०२२ मध्ये तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांऐवजी अन्य व्यक्तींच्या नावे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रोत्साहन अनुदान दिले, असा आरोप आहे.

Sarpanch, village development officer Songir dhule suspended embezzlement case
अपहार प्रकरणी धुळे जिल्ह्यात सरपंच, ग्रामविकास अधिकारी निलंबित (प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे: स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेत ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने २१ लाख ३६ हजारांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आल्याने तालुक्यातील सोनगीर येथील तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सोनगीर ग्रामपंचायतीत २०२२ मध्ये तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांऐवजी अन्य व्यक्तींच्या नावे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रोत्साहन अनुदान दिले, असा आरोप आहे. यासंदर्भात दाखल तक्रारींची चौकशी झाली. चौकशीत २१ लाख ३६ हजारांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले. तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्यासमोर सादर करण्यात आला.

हेही वाचा… नोंदणी मुद्रांक विभागाद्वारे आता दर्जेदार सेवा; पालकमंत्री दादा भुसे यांना विश्वास

या पार्श्वभूमीवर सोनगीरचे तत्कालीन सरपंच आर. जी. ठाकरे आणि ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांना निलंबित केले. ग्रामविकास अधिकारी बोरसे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुप्ता यांनी बोरसे यांना निलंबित केले

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sarpanch village development officer from songir dhule suspended in embezzlement case dvr

First published on: 05-10-2023 at 15:35 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा