लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील सुनिता सोनवणे या फिरण्यासाठी बाहेर पडल्या असता दुचाकीवरून आलेल्या संशयित खोपड्या उर्फ रोशन झोरे (रा. जोशीवाडी) याने दीड तोळ्याचे ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून घेतले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत विमशा पहुरकर (२८) यांच्या घरातून लॅपटॉप, भ्रमणध्वनी, दोन स्मार्टवॉच, सोने, चांदी असा ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा-नाशिक, दिंडोरीत बंडखोरांना शांत करण्यासाठी आता धडपड

तिसरी घटना मालेगाव तालुक्यात घडली. सलाउद्दीन जाकीर यांच्या घरातून चोरट्याने दोन लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.