पनवेल :  एक तरुण रात्रीच्या साडेबारा वाजता दोन मुलींसोबत भांडत होता. तो तरुण मोठ्या आवाजात का भांडतोय, हे तिथे रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या एका ६९ वर्षीय डॉक्टरांनी पाहीले. एवढेच निमित्त झाल्याने या २० वर्षीय तरुणाने लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फॅक्चर झाले. हा सर्व प्रकार कामोठे वसाहतीमधील सेक्टर ७ येथे बुधवारी मध्यरात्री घडला.

हेही वाचा >>> अटलसेतूवरील महिला कर्मचाऱ्याला दमदाटी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 69 year old doctor assaulted brutally in kamothe by youth zws
First published on: 24-05-2024 at 18:02 IST