पनवेल : खारघर वसाहतीमध्ये आफ्रिकेतील महिलांच्या माध्यमातून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायामधील दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर सहा महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री खारघर पोलिसांनी केली.

मागील काही महिन्यांपासून आफ्रिका देशातील महिला खारघरमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खारघरमधील सेक्टर १२ ई येथील एका रो हाऊसवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.

हेही वाचा – पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा

हेही वाचा – फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव

बुधवारी संबधित रो हाऊसमध्ये पोलिसांच्या पथकाने रात्री छापा घातल्यानंतर २६ व ३० वर्षीय दोन परदेशी तरुणींना ताब्यात घेतले तसेच इतर सहा परदेशी महिला या रो हाऊसमध्ये पोलिसांना आढळल्या. पोलिसांच्या पथकाने अधिक चौकशी केल्यावर त्यांना तीन महिला या इतर सहा मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. मूख्य सूत्रधार महिला पळाल्याचे समजते. पोलिसांनी या सर्व महिलांची पारपत्रे तपासल्यानंतर त्यांना या महिलांचे भारतात येण्याचे कारण समजले. मात्र यातील सहा महिलांनी दिलेल्या जबाबावरून तीन महिला या परदेशी महिलांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करून घेत होत्या असे समजले. संशयित आरोपींचे त्रिकूट या पीडितांकडे गिऱ्हाईक पाठवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होत्या.