लोकसत्ता टीम

पनवेल : कळंबोली परिसरात एक लाख रुपये किमतीचा चार किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थासह एकाला पोलीसांनी अटक केली. नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणी आसूडगाव येथे राहत असलेल्या ३४ वर्षीय दिनेश जाधव याला अटक करण्यात आले आहे.

आणखी वाचा-दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी

पोलीसांना गांजा या अंमलीपदार्थ घेऊन एक व्यक्ती कळंबोली स्टीलबाजाराच्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कोकरे, पोलीस उपनिरिक्षक मंगेश बाचकर, पोलीस हवालदार रमेश तायडे व इतर पोलीसांनी मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता सापळा रचल्यावर तेथे संशयीत तरुण आल्याचे दिसले. संशयीताच्या हातामधील पिशवीची झडती घेतल्यावर त्यामध्ये ४ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा होता. पोलीसांचे पथक दिनेशने हा गांजा कुठून आणला, तो कोणाला विक्री करत होता याचा शोध घेत आहेत.