Premium

११ हजार दिव्यांच्या दीपोत्सवात सुधागड उजळून निघाली

कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी संस्थेचे प्रांगण मंगळवारी रात्री ११ हजार दिव्यांच्या दीपोत्सवात उजळून निघाले.

premises of Sudhagad Education Society
दीपोत्सवामध्ये दादांच्या आठवणींना उजाळा देत दादांची भव्य रांगोळी काढून त्यावर दिवे प्रकाशित केले होते.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल: कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी संस्थेचे प्रांगण मंगळवारी रात्री ११ हजार दिव्यांच्या दीपोत्सवात उजळून निघाले. कार्तिकी त्रिपुरारी पोर्णिमा आणि दादासाहेब लिमये यांची १०४ वी जयंती यानिमित्त सुधागड एज्युकेशन संस्थेने शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना घरून पणती आणून दिवा पेटवून दीपोत्सव करण्याचे आयोजन केले होते. प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच कळंबोलीत दीपोत्सवाचे आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांनी दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती.

आणखी वाचा-१३ किलोमीटरच्या खोपटे ते चिरनेर मार्गे दास्तान रस्त्याचे होणार काँक्रीकरण

स्पर्धेच्या युगात सवलतीच्या दरात गरीबांच्या शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये यांनी सुधागड संस्थेची स्थापना केली. एका लहान शाळेपासून सुरु केलेल्या सुधागड संस्थेच्या असंख्य शाळा रायगड जिल्ह्यात आहेत. हजारोच्या संख्येने विद्यार्थी या संस्थेच्या शाळांमध्ये जिल्हयात ठिकठिकाणी शिकतात. कळंबोली वसाहतीमध्ये ३५ वर्षांपूर्वी माथाडी कामगारांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न निर्माण झाल्यावर सुधागड शैक्षणिक संस्थेने शाळा सूरु करुन शेकडो माथाडी कामगारांच्या मुलांना माफक दरात शिक्षण दिले. संस्थेचे प्राचार्य पालवे यांनी त्रिपुरारी पोर्णिमेच्या निमित्त आयोजित केलेल्या दीपोत्सवामध्ये दादांच्या आठवणींना उजाळा देत दादांची भव्य रांगोळी काढून त्यावर दिवे प्रकाशित केले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premises of sudhagad education society were lit up during the lamp festival mrj

First published on: 29-11-2023 at 17:56 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा