कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विविध अंगांनी जसजसा विस्तारत गेला आणि त्याचे उपयोजन मोठय़ा प्रमाणावर सर्वदूर होऊ लागले उदाहरणार्थ- उत्पादन, सेवा, कार्यालय आणि निवास क्षेत्रांत, तसे त्याचा मागोवा घेण्यासाठी त्याच्या विकासाच्या अवस्थांचे वर्गीकरण करणे अनिवार्य झाले. ढोबळमानाने सबळ (स्ट्राँग) आणि मर्यादित (नॅरो) कृत्रिम बुद्धिमत्ता असा मतभेद केला जातो. सबळ कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे प्रगत आज्ञावलीसंपन्न अशी प्रणाली, जी मानवी मेंदू करू शकत असलेल्या अधिकांश संज्ञानात्मक (कॉग्निटीव) गोष्टी जवळपास त्याच प्रमाणात करू शकण्यास समर्थ असेल. अशी प्रणाली अर्थातच टय़ुरिंगच्या चाचणीत उत्तीर्ण होणे अपेक्षित असते. मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी प्रणाली जी केवळ विशिष्ट कामासाठी संरचित आणि प्रशिक्षित असेल. कारखान्यात जुळवणी साखळीवर (असेम्ब्ली लाइन) निर्देशित ठरावीक काम करणारे औद्योगिक यंत्रमानव हे तिचे एक उदाहरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचे अधिक औपचारिक वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते. ते व्यापक असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सध्याच्या आणि आगामी कुठल्याही प्रणालीला वर्गीकृत करण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यातील पहिले वर्गीकरण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेवर (कॅपेबिलिटी) आधारित आहे. त्याचे तीन प्रमुख उपविभाग आहेत. मर्यादित, व्यापक किंवा सर्वसाधारण (जनरल) आणि परिपूर्ण किंवा सर्वोत्तम (सुपर) कृत्रिम बुद्धिमत्ता असे हे वर्ग आहेत. एका अर्थाने ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचे टप्पे पुढे आणतात. तंत्रज्ञानातील प्रगती, मुख्यत्वे स्मृतिमंजूषेची धारण आणि प्रक्रिया क्षमता त्याच्या मुळाशी आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal state of artificial intelligence amy