-
'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या मंचावर अभिनेता हृतिक रोशनच्या येण्याने 'चार चांद' लागले असेच म्हणावे लागेल. नेहमीच विविध सेलिब्रिटींच्या येण्याने गजबजलेल्या 'झलक..'च्या सेटवर हृतिक रोशन आला आणि सारा माहोलच बदलून गेला. जॅकलिन फर्नांडिस आणि हृतिकने या मंचावर येत उपस्थितांची मने जिंकली. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात काही प्रसिद्ध चेहरे त्यांचे नृत्यकौशल्य सादर करतात हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण हृतिकच्या नृत्यकौशल्याला आव्हान देणं काही तितकं सोपं नाही. तरीसुद्धा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने हृतिकला आव्हान देत आपल्या नृत्यकौशल्याने अनेकांचीच मनं जिंकली. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या 'काबिल' या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये हृतिक 'रोहन भटनागर' नावाच्या अंध व्यक्तिच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश रोशन यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. हृतिकसह अभिनेत्री यामि गौतमही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
हृतिक जितका त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकाच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रसिद्धी त्याला त्याच्या नृत्यकौशल्यामुळे मिळते. त्यामुळे हृतिकसोबत स्वत:चे नृत्यकौशल्य सादर करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरही स्वत:ला रोखू शकला नाही. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
या कार्यक्रमातील एका खास भागाला हृतिकच्या हजेरीमुळे सर्वजण आनंदित दिसत होते. पण, फराह खान आणि जॅकलिनची मात्र वेगळीच धम्माल सुरु होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
'झलक दिखला जा' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे आता 'झलक…'ची धम्माल आता थेट पुढच्या पर्वातच पाहायला मिळणार आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
करण जोहर आणि त्याची बी टाऊनमधील कलाकारांसोबत असलेली मैत्री नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. 'झलक..'च्या या भागातही करण आणि फराहने एका सुंदर फोटोसाठी पोझ दिल्याचे दिसले. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
‘झलक…’च्या मंचावर हृतिक आणि जॅकलिनची धम्माल
Web Title: Hrithik roshan jacqueline fernandez create magic on jhalak dikhhla jaa grand finale