-
बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरचा बिग बॉस ओटीटी हा शो चर्चेत असतो.
-
या शोमधील स्पर्धक उर्फी जावेद देखील सतत चर्चेत आहे.
-
पहिल्याच आठवड्यात बिग बॉस ओटीटीच्या घरातून उर्फीला बाहेर पडावे लागले.
-
पण घरातून बाहेर पडताच उर्फीने एका मुलाखतीमध्ये शो विषयी आणि बिग बॉस विषयी अनेक खुलासे केले.
-
उर्फी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
-
तिचे हॉट फोटो नेहमी चर्चेचा विषय ठरतात.
-
आता उर्फीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आवाहन केले आहे.
-
या फोटोमध्ये उर्फीने निळ्या रंगाची जिन्स आणि बॅकलेस टॉप परिधान केल्याचे दिसत आहे.
-
हा फोटो शेअर करत तिने ‘या इन्स्टाग्राम पोस्टला कॅप्शन देण्यासाठी मी गुगलवर सर्च करत आहे. पण नंतर मला आठवले की तुम्ही माझी मदत कराल. मला चांगले कॅप्शन सुचवा आणि तिन हजार रुपये जिंका’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
-
एका यूजरने ‘आपले जवळचे नाते आहे. मी तुझी बहिण आहे. मला हे जिंकायचे आहे’ असे म्हटले आहे.
-
तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुला लाज वाटत नाही का?’ असे म्हणत सुनावले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर उर्फीचे हे फोटो चर्चेत आहेत.
-
अनेकजण कमेंट करत तिला ट्रोल करताना दिसत आहे.
-
(All Photos: Urfi Javed Instagram)
‘तुला लाज वाटत नाही का?’, हॉट फोटोमुळे उर्फी जावेद झाली ट्रोल
करण जोहरचा बिग बॉस ओटीटीमध्ये उर्फी सहभागी झाली होती.
Web Title: Urfi javed share backless photos and get troll avb