-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बबिता ही भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ताने साकारली आहे.
-
बबिता आणि जेठालाल यांच्यामधील संवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
-
आता बबिताने नवे घर खरेदी केले आहे.
-
नव्या घरातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मुनमुन दत्ताने नव्या घरात दिवाळी साजरी केली आहे.
-
दिवाळी साजरी करतानाचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करत तिने ‘चित्रीकरणामध्ये व्यग्र असताना नव्या घरात शिफ्ट होणं थोडं आव्हानात्मक होतं. पण एका नवीन प्रवासाला सुरुवात करताना आनंद होत आहे. माझे स्वप्न पूर्ण झाले आहे’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
-
पुढे ती म्हणाली, ‘सोशल मीडियापासून काही दिवस ब्रेक घेत आहे. आई आणि माझ्या जवळच्या लोकांसोबत मी वेळ घालवणार आहे.’
-
मुनमुनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अतिशय आनंदी दिसत आहे.
-
तिने नवीन घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहून फोटो काढले आहेत.
-
दरम्यान तिने पिवळ्या रंगाचे ड्रेस परिधान केला आहे.
-
या सर्व फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
मुनमुनने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(All Photos : Munmun Dutta instagram)
PHOTOS: ‘तारक मेहता…’मधील बबिताने खरेदी केले नवे घर, फोटो व्हायरल
‘तारक मेहता…’मध्ये बबिता ही भूमिका मुनमुन दत्ताने साकारली आहे.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah babita aka munmun dutta buy new house avb