-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही.त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह सध्या मीन राशीत विराजमान असून तो १७ मार्च रोजी या राशीत अस्त होणार आहे असून त्याचा २३ मार्च रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी उदय होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचा उदय काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल, काही राशींचे भाग्य चमकण्यास आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राची उदित अवस्था खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या कामातील अडथळे दूर होईल, प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. या राशीच्या व्यक्तींना या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राची ही स्थिती मकर राशीसाठी लाभादायी ठरेल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्णत्वास येतील. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासही वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही शुक्राची ही स्थिती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील प्रश्न सुटतील. कामाच्या ठिकाणी तुमचेच वर्चस्व असेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
२३ मार्चपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राची अस्त अवस्था देणार सुख, समृद्धी आणि संपत्तीचे सुख
Shukra gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह सध्या मीन राशीत विराजमान असून तो १७ मार्च रोजी या राशीत अस्त होणार आहे असून त्याचा २३ मार्च रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी उदय होईल.
Web Title: From 23rd march shukra ast three zodiac signs will get happiness prosperity and wealth sap