-
जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. या नव्या स्ट्रेनची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. हा नवीन स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.
-
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनपासून ७० टक्के संक्रमण होण्याचा जास्त धोका आहे. त्यामुळे अनेक देशात आंतरराष्ट्रीय विमान सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टया सुरु होत असताना, जगासमोर आता हे एक नवीन संकट उभ ठाकलय.
-
भारत सरकारकडून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी, 'सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नाही' असे म्हटले आहे.
-
सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नेदरलँड आणि बेल्जिअमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.
-
वेगाने फैलावणाऱ्या करोनाच्या या स्ट्रेनला नियंत्रणात ठेवण्यासाठी लंडनमध्ये काही महिन्यांसाठी पुन्हा लॉकडाउन करावे लागू शकते असे यूकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी म्हटले आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा ३० डिसेंबरला आढावा घेण्यात येईल. (फोटो सौजन्य – AP Photo/Matt Dunham)
-
ब्रिटनच नाही तर दक्षिण आफ्रिकेतही करोनाच्या या नव्या स्ट्रेनचे अस्तित्व आढळून आले आहे. लंडनमध्ये ६० टक्के लोकांना या नव्या स्ट्रेनमुळे करोनाची बाधा झाली आहे
-
नेदरलँडमध्ये करोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण सापडला आहे.
-
ब्रिटनहून नुकत्याच परतलेल्या इटलीतील एका नागरिकाच्या शरीरातही हा स्ट्रेन सापडला आहे.
-
सौदी अरेबियाने फक्त आंतरराष्ट्रीय विमान सेवाच स्थगित केलेली नाही, तर जमीन, बंदरमार्गे देखील प्रवेशबंदी केली आहे.
-
ब्रिटन ते नेदरलँड प्रवासी विमान सेवा एक जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. ब्रिटन, डेन्मार्क आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या परदेशी प्रवाशांना इस्रायलने प्रवेशबंदी केली आहे.
फक्त ब्रिटनच नाही ‘या’ देशांमध्ये सापडले करोनाच्या नवीन स्ट्रेनचे रुग्ण, ७० टक्के संक्रमणाचा धोका
Web Title: New strain of coronavirus in uk triggers series of travel ban dmp