
महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर श्रीलंकेत हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.

संतापलेल्या जनतेने अनेक राजकीय नेत्यांच्या घरांना आग लावली आहे. यात महिंदा राजपक्षे यांच्या घरालाही आग लावल्याची घटना घडली आहे

परिणामी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.

मात्र, सरकारच्या या नियमांना पायदळी तुडवत श्रीलंकेत नागरिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी आणि हिंसाचार सुरुच ठेवला आहे.

या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेसह खासगी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.

सरकारविरोधी समर्थक अशा प्रकारे अनेक ठिकाणी तातपुरत्या स्वरुपाच्या झोपड्या बांधून राहत आहेत.

सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी कोलंबोमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांना मारहाण केल्याची देखील घटना घडली आहे.

या हिंसाचारात एका राजकिय नेत्याचा मृत्यू झाला आहे,

या हिंसाचारात ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

जमावाने महिंदा आणि गोटाबाया यांचे वडील डी ए राजपक्षे यांच्या स्मरणार्थ बांधलेले – मेदामुलाना, हंबनटोटा येथील स्मारकरेही नष्ट केली आहेत.

श्रीलंकन सरकारने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या इतरांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर गोळीबाळ करण्याचे निर्देश दिले आहेत.

आक्रमक झालेल्या जनतेला शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर करावा लागला